उद्या पासून धावणार परळी बसस्थानकातून लालपरी ; अंबाजोगाई – बीड ला असणार प्रत्येकी सहा फेऱ्या – रणजीत राजपूत
परळी: लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर तात्पुरती बंद केलेली एसटीची सेवा उद्यापासून सुरू केली जाणार आहे. मात्र ही सेवा जिल्ह्यांतर्गत असल्याने प्रवाशांना जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.सकाळी सात वाजता परळी वरून बीड साठी पहिली लालपरी लॉक डाऊन नंतर धावणार आहे. त्यानंतर परळी अंबाजोगाई फेरी होईल अशा प्रत्येकी सहा फेऱ्या दररोज केल्या जाणार आहेत. या सहा फेऱ्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 याच वेळेत केल्या जाणार आहेत.यासाठी प्रवाशांना सोशल डिस्टन्स सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागणार असून एका फेरीला केवळ 22 प्रवाशांनाच बस मधून प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी या सर्व नियमांचे पालन करूनच प्रवास करावा असे आवाहन परळी वैजनाथ आगार प्रमुख रणजित राजपूत यांनी केले आहे.प्रवासादरम्यान प्रवाशांनी स्वतःचे मास्क घालणे अनिवार्य असून सॅनिटायझरही सोबत ठेवावे असे त्यांनी म्हटले आहे.