इंग्रजी माध्यम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फीस माफ करावी- संजय सावंत
औरंगाबाद : संपूर्ण जगा सहित भारतावर सुद्धा कोरोणा चा रोग पसरला आहे त्यामुळे संपूर्ण भारत देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले यामध्ये कोरोणा चे रुग्ण सर्वाधिक जास्त महाराष्ट्र मध्ये आढळून आले आहेत सध्या कोरोना रोग्याच्या साथीमुळे सर्व लॉक डाऊन करण्यात आले आहे त्यामुळे सर्वांचे कामधंदे ठप्प आहेत पालकांचे स्वतःचे चरितार्थ चालवणे कठीण झाले आहे त्यामुळे इंग्रजी शाळेत शिकत असलेल्या पालकांना शालेय फिस भरणे शक्य नाही या चालू 2019- 20 शैक्षणिक वर्षात आपण दिलेल्या सवलतीमुळे पालकांना दिलासा मिळाला आहे आपल्या या निर्णयांचे शिव क्रांती सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने जाहीर अभिनंदन या अनुषंगाने पुढील शैक्षणिक वर्ष 2020 2021 या वर्षाची फिज माफ करावी असे आदेश महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी शाळा संचालकांना देण्यात यावेत व सर्व पालकांना दिलासा द्यावा ही विनंती करण्यात येत आहे अन्यथा पालकांच्या संतप्त भावना लक्षात घेत शिव क्रांती सेना संघटनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर लॉक डाऊन चे नियम पाळून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे शिवक्रांतीसेना संस्थापक अध्यक्ष संजय सावंत व पदाधिकारी यांनी शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांना पत्र दिले आहे.