आ. कुचे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मिळाली शासकीय मदत.
जालना (प्रतिनिधी)। बदनापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आ. नारायण कुचे यांनी शासकीय मदत मिळवून दिली आहे. मदतीच्या धनादेशाचे सोमवार(दि. 7) लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबांना आ. नारायण कुचे यांच्या पुढाकाराने शासकीय मदत मिळाली आहे. यात रूक्मीनबाई ढाकणे, मीरा गायकवाड, वंदनाबाई सातपुते ,कांताबाई बकाल ,शांताबाई राठोड, ओमराज बकाल ,राजेंद्र काळे, परमेश्वर शेळके , भाऊसाहेब कोल्हे ,रामू केशव ढाकणे, जगन्नाथन पंखुले, विलास ढाकणे, मधुकर दाभाडे या लाभार्थींना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी एकनाथ मोरे, प्रमोद शिंदे, उद्धव काळे, गणेश बावणे, अंकुश आरसूळ, अरुण ताडगे ,सुदाम बोचरे, बाबासाहेब कऱ्हाळे, जनार्दन सोरमारे, नंदू शेळके, उद्धव गीते परमेश्वर शिंदे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
