आष्टी तालुक्यातील मातवली येथे पूर्णवेळ संचारबंदी ; कन्टेनमेंट झोन घोषित–जिल्हाधिकारी राहुल रेखावार
आष्टी : तालुक्यातील मातवली येथे कोरोना विषाणू लागण ( covid-19 पॉझिटिव्ह) झालेली व्यक्ती आढळून आल्याने कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवाल दिला असून कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याने आष्टी तालुक्यातील मातवली हे गाव कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. वरील सर्व परिसर अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लाॅकडाऊन 30 जून 2020 पर्यंत वाढविला असल्याने, जिल्ह्यात दिनांक 30 जून 2020 रोजीचे रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिता चे कलम 144 ,(1)(3) नुसार लागू करण्यात आले आहे. तसेच सदर आदेश या आदेशा सह अंमलात राहतील.