आवश्यक ती सर्व सावधगिरी बाळगून सिरसाळ्याला कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य – पि. एस आय.विग्ने साहेब
सिरसाळा : कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असला तरी सिरसाळ्यातील नागरिकांना या धोक्यापासून दूर ठेवण्यात प्रशासनाच्या मदतीने यश आले आहे, येथून पुढे देखील सावधगिरी बाळगून शहरास कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य राहील; असे प्रतिपादन सिरसाळा पोलीस स्टेशन चे पि.एस.आय. विग्ने साहेब यांनी व्यक्त केले.
श्री.विग्ने साहेब म्हणाले, करोणाच्या अनुषंगाने शहरात आत्तापर्यंत चांगले काम झाले आहे परंतु येथून पुढे देखील सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या आपण बाहेरील जिल्ह्यातील ऊस तोड कामगार व मजुरांना जिल्ह्यात प्रवेश देत आहोत, या प्रसंगी योग्य ती काळजी घेतली जावी. इतर जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने प्रवासी जिल्ह्यात येऊ नये यासाठी देखील खबरदारी घेतली जाणार असे ते म्हणाले. तसेच यासाठी पोलीस बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढवण्यात येणार असे हि ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या बाबत देखील संवेदनशील राहून उपाययोजना केले जात आहे, फळभाजी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांना विक्री करण्यासाठी अधिक सोयीस्कर निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे.