आयडीबीआय बँकेसमोर ग्राहकांची गर्दी ; अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार – अॅड.मनोज संकाये
सोशल डिस्टंसिंगचा बँकेकडून फज्जा.
परळी : मोंढा मार्केट येथील परळीतील आयडीबीआय बँकेसमोर ग्राहकांची व शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे .कोरोना या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळण्याचा आग्रह करण्यात येतो परंतु बँकेच्या अधिकाऱ्याकडून नियमाचे महत्व समजून न घेतात उल्लंघन करण्यात येत आहे. ते न होता रांगेतच सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळून बँकेने ग्राहकांना सहकार्य करावे अशी मागणी युवा नेते ऍड .मनोज संकाये यांनी केली आहे.
सध्या शेतकऱ्यांसाठी पेरणीचा हंगाम सुरू आहे .याच धर्तीवर शासनाकडून बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा करण्याचे आदेश आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी बँकेसमोर जागा नसल्यामुळे व बँक प्रशासनाकडून त्यांची कसलीही ही सोय होत नसल्यामुळे गर्दी होत आहे त्यातच सामान्य बँकेचे खातेदार असल्यामुळे ही गर्दी वाढत आहे. बँकेतील ठराविक खातेदारांना डायरेक्ट प्रवेश दिला जात आहे त्यामुळे रांगेत थांबलेल्या सामान्य व शेतकरी यांच्यावर अधिकारी आवेरावीची भाषा वापरत आहेत.
बँकेच्या अधिकाऱ्याकडून मनमानी कारभार सुरू आहे. बँकेचे सामान्य ग्राहक व शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा हा प्रश्नच आहे .याची सर्वत्र चर्चा सामान्य नागरिकात होत आहे परळी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना उन्हात उभे राहू नये म्हणून मंडपाची सोय केली आहे परंतु अशी कोणतीच सोय आयडीबीआय बँकेने ग्राहकांसाठी केलेली नाही म्हणून आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी शेतकरी व सामान्य ग्राहकांना योग्य ती वागणूक द्यावी अशी मागणी ऍड .मनोज संकाये यांनी केली आहे.