आमदार राजेश पाडवी यांनी केला तात्काळ रस्ता दुरुस्त…

नंदुरबार (प्रतिनिधी)

तरावद ते मोड या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अनेक दिवसापासून दुरवस्था झाली होती.या रस्त्यावरून वाहन धारकांना कसरत करावी लागत असल्याने व सद्या ऊस तोडणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. काही शेतकऱ्यांनी ही तक्रार मतदार संघातील आमदार राजेश पाडवी यांच्या कडे घेवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. व याच मागणीला पाडवी यांनी लक्षात घेत,तात्काळ जेसीबी पाठवत हा रस्ता दुरुस्त करण्यात सुरुवात केली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *