..आणखी दोन तरूण अन्नदात्यांनी आपली जिवन याञा संपवली…

माजलगाव : शेतीतील नापिकी आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर यातून शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्यात सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यात होत आहे. गेल्या वर्षी वर्षभरात दोनशे पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. यावर्षीही आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. माजलगाव तालुक्यातील दोन तरूण शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या दोन्ही आत्महत्या नापिकीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून केल्याचे समोर आले आहे.
माजलगाव तालुकयात असलेल्या मोठेवाडी येथील २२ वर्षीय भागवत पांडूरंग पाष्टे या तरूण शेतकर्‍याने शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या आत्महत्येची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या शेतकर्‍याने कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. दुसरी आत्महत्येची घटना याच तालुक्यातील आनंदगाव येथे घडली. अनिल उत्तमराव घायाळ वय ३० वर्ष या शेतकर्‍याने आपल्या राहत्या घरी लोखंडी पाईपला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *