Uncategorized

आई-वडिलांचा सांभाळ न करणार्या बीड जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पगार कपात करा – दत्ताभाऊ वाघमारे लातूरच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य हा प्रश्न लावून धरतील का ? .

गेवराई : प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती खुप गंभीर झाली असून, धक्कादायक घटना देखील घडतच आहेत. शासकीय नोकरदार असूनही अनेकजण वृद्धपकाळात आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. तर अनेकजण आपल्या आई-वडिलांचा सांभाळ देखील करीत नाहीत. यावर पर्याय म्हणून आताच लातूर जिल्हा परिषदेने अनोखा ठरावच सर्वसाधारण सभेत घेतला असून, जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही, त्याच्या पगारातून 30 टक्के रक्कम ही आई-वडिलांना उदरनिर्वाहसाठी मिळणार आहे. त्याच धर्तीवर बीड जिल्हा परिषद ठराव घेऊन आई वडील यांना न सांभाळणार्या कर्मचाऱ्यांचा पगार कपात करून तो आई वडिलांना देण्यात यावा असे मत दत्ताभाऊ वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. आई-वडिलांनी पालन-पोषण केल्यानंतरच मुले सक्षम होतात. पण त्यांच्या वृद्धपकाळात मुलांना आई-वडिलांच्या कष्टचा जनू विसरच पडतो, तर अनेकांना नीटनेटकी वागणूकही मिळत नाही. परिणामी मुलगा शासकीय नोकरदार असताना देखील त्यांना वृद्धपकाळात आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. यावर जालीम पर्याय म्हणून लातूर जिल्हा परिषदेने एक ठराव मंजूर केला असून, जो कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही त्यांच्या पगारातील 30 टक्के रक्कम ही थेट आई-वडिलांच्या खात्यांमध्ये वर्ग केली जाणार आहे. या अनोख्या ठरावाचे सर्वोत्र कौतुक होत असून तसा ठराव बीड जिल्हा परिषदेत घेण्यात यावा व आई-वडिलांचा सांभाळ न करणार्या बीड जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा 30 % पगार कपात करून तो आई-वडिलांना देण्यात यावा. लातूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा अनोखा मुद्दा मंचकराव पाटील यांनी उपस्थित केला होता. यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी त्वरित सहमती दर्शविली. केवळ शिक्षकलाच नाही तर इतर कर्मचारी यांनाही हा नियम लागू करता येईल याची माहिती घेण्यास सांगितले आहे. जे शिक्षक बदलीसाठी किंवा रजेसाठी आई-वडिलांच्या तब्येतीची कारणे पुढे करतात आणि दुसरीकडे त्यांच्या सांभाळाची वेळ येते तेव्हा दुर्लक्ष करतात. त्यामुळे हा अनोखा निर्णय लातूरात घेण्यात येतो मग बीड मध्ये का नाही असा सवाल देखील उपस्थित होत आहे, असा निर्णय जर बीड जिल्ह्यातील एकाही जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केला तर एक उत्तम निर्णय असून असा ठराव मंजूर होऊ शकतो आणि आजमितीस या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे मत दत्ताभाऊ वाघमारे यांनी व्यक्त केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *