अहिल्यादेवी होळकर जयंती घरात साजरी करा : नवीन जगमाने
परतूर (प्रतिनिधी) – राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याची जयंती 31 मे रोजी असून जयंती आपापल्या घरात राहून साजरी करावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते नवीन जगमाने यांनी केले.कोरोनाचे भयंकर संकट आलेले आहे.31 मे रोजी राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी याची जयंती संपूर्ण अहिल्याप्रेमींनी आपापल्या घरात राहून साजरी करून या संकटावर मात करण्यासाठी महत्वाची भूमिका वाजवून आपले देशासाठी योगदान द्यावी.अहिल्यादेवी होळकर याच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते नवीन जगमाने यांनी केले आहे.