अवैध सहा क्विंटल तंबाखू पकडली; गोंदी पोलिसांची कारवाई
जालना (प्रतिनिधी) – लॉकडाऊनचे उल्लंघन करून अवैध मार्गाने सहा क्विंटल तंबाखू घेऊन जाणाऱ्या वाहन व तंबाखू असा 4 लाख 10 हजाराचा मुदे्माल वाळकेश्वर येथे गोंदी पोलिसांनी जप्त केला. कलम 188 सह.269, भा.द.वी.सह 51 ( ब ) आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रमाणे दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक प्रमोंद बोंडले, जमादार भास्कर आहेर, पोकाँ. मदन गायकवाड, अविनाश पगारे, गणेश लकस, नितीन खराद, महेश तोटे आदींनी केली आहे.अवैध धंद्याविरुद्ध कारवाई कायम सुरूच ठेवण्याचा इशारा स.पो.नि.जोगदंड यांनी दिला आहे.