अवैध वाळू वाहातूक करणारे तीन ट्रक्टर जप्त महसूल विभागाची कारवाई…!
कुंडलवाडी : मांजरा नदिच्या नागणी वाळु घाटातुन रात्रीच्या वेळी चोरटी वाहतुक करणारे तीन ट्रक्टर पकडून महसुल विभागाने कारवाई केली आहे.
प्रत्येकास १ लाख १५ हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.गेल्या वर्षभरापासुन बिलोली तालुक्यात वाळुचा लिलाव झाला नाही यामुळे अनेकांचे बांधकाम खोंळबले आहे . परिणामी चोरटी वाहतुक करणाऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.शासनाचा करोडो रुपयाचा महसुल बुडवुन रेतीची चोरटी वाहतुक होत असून फुकटची रेती अव्वाच्या सव्वा दराने विक्री करण्यात येत आहे.यात शासनाचा लाखोचा महसुल बुडत आहे.चालू
जुन महीण्यात तीन वेळा तहसिल विभागाच्या महसुल विभागाने कारवाई केली.नुक्तेच दि.26 जून रात्री नायब तहसिलदार डॉ.ओमप्रकाश गोंड,उत्तम निलावाड,अनिल परळीकर यांनी रात्रीच्या वेळी गस्त घालुन नंबर नसलेल्या तिन ट्रक्टरवर कारवाई केली.यात प्रत्येकी ११५४०० असा ३ लाख ४६ हजार २०० रुपये दंड लावला आहे.कारवाई होत असली तरी या भागात चोरटी वाहतुक काही कमी होत नसल्याचे चित्र चित्र दिसायला मिळतील आहे.