अवैध देशी दारूची वाहतुक करणाऱ्यांवर छापा

आमठाणा (प्रतिनिधी) – आमठाणा चौकीचे पोलीस कर्मचारी हे आमठाणा दुरक्षेत्र भागामध्ये पेट्रोलिंग करीत असतांना , मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे त्यांना घाटनांद्रा बसस्टॉप जवळ आमठाणा रोडवर पांढऱ्या रंगाची इंडिका कार क्रमांक एमएच २६ ई. ० ९ २ ९ मध्ये श्रीरंग राघोबा सिरसाठ तय २१ वर्षे व मुस्ताक शगीर पटेल वय १ ९ वर्षे रा . धामणी ता. सिल्लोड यांच्या ताब्यामध्ये २६,१०० रु. किंमतीच्या देशी गुरु टैंगो पंच नांवाचे ० ९ बॉक्स (४३२ बॉटल) मिळून आल्याने, सदर प्रकरणी पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कोरोना संदर्भाने आमठाणा चौकीचे बीट जमादार देवीदास जाधव , सचिन सोनार , काकासाहेब सोनवणे असे आमठाणा , घाटनांद्रा भागामध्ये खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत होते . संध्याकाळी ६.३० वाजेचे सुमारास ते घाटनांद्रा येथे पाण्याच्या टाकीजवळ रोडवर असताना , त्यांना पाचोरा रोडने आमठाणा कडे एक पांढया रंगाची इंडिका कार क्रमाक एमएच २६ ई. ० ९ २ ९ हि येताना दिसली . सदर गाडीवर संशय आल्याने , सदर गाडीचा पाठलाग करुन , सदर गाडीला घाटनांद्रा बसस्टॅन्ड जवळ थांबविली असता , त्यामध्ये बसलेल्या इसमांकडे कोरोना संदर्भाने कोणतेही सुरक्षा नसल्याने दिसल्याने , त्यांना त्यांचे नांव विचारता त्यांनी त्यांचे नांव श्रीरंग राधोबा सिरसाठ वय २१ वर्षे व मुस्ताक शगीर पटेल वय १ ९ वर्षे रा . धामणी ता . सिल्लोड असे सांगुन , त्यांना – गाडीमध्ये काय आहे .. गाडीचे कागदपत्रे इत्यादी बाबत विचारणा केली . गाडीचे कागदपत्रे नसल्याने त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले असता , वाहनाची तपासणी केली असता , गाडीच्या डिक्कीमध्ये २६,१०० / – रुपये किंमतीचे देशी दारु टैंगो पंच नांवाचे ० ९ बॉक्स ( १८० एम.एल.च्या ४३२ सिलबंद काचेच्या बॉटल ) मिळुन आल्याने , ते पंचासमक्ष जप्त करण्यात आलेले आहे. सदर प्रकरणी पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण येथे नमुद इसमांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन , गुन्हयांचा पुढील तपास स.पो.नि. श्री किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. श्री सचिन सोनार हे करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधिक्षक गणेश गांवडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे व सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों  देवीदास जाधव , पो.ना. सचिन सोनार व काकासाहेब सोनवणे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *