LatestNewsबीड जिल्हा

अवैध गुटख्याची वाहतुक करणारा पिकअप टेम्पो जप्त


स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाची कामगिरी

अवैध गुटख्याची वाहतुक करणारा पिकअप टेम्पो जप्त करुन ८,२३,६८० / – रुपयांच्या गुटख्यासह एकुण १४,२३,६८० / – रुपयांचा मुद्देताल जप्त

बीड : मा . पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए . पोद्दार सो यांनी पोनि स्थागुशा बीड यांच्या विशेष पथकाला अवैध धंदयांची माहीती काढुन दर्जेदार केसेस करुन अवैध धंदयांचे उच्चाटन करण्याच्या सुचना दिल्याने विशेष पथकाचे सपोनि आनंद कांगुणे व पथकातील कर्मचारी हे दिनांक 14/07/2020 रोजी 23.45 वा च्या सुमारास माजलगाव शहरात अवैध धंदयांवर कारवाई करणेकामी गस्त करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , गढी रोडने माजलगावकडे एक गुटख्याने भरलेला पिकअप टेम्पो क्रमांक एम एच 44-9301 हा येणार आहे . नमुद बातमी मिळताच सपोनि कांगुणे व त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांनी माजलगाव शहरात संभाजी चौक येथे सापळा रचला . काही वेळातच गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीतील वर्णनाचा पांढऱ्या रंगाचा महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच 44-9301 हा गढी कडुन माजलगाव कडे येताना पोलीस पथकास दिसला . पोलीस पथकाने नमुद पिकअप चालकास थांबण्याचा ईशारा केला असता नमुद पिकअप न थांबता तेथुन निघुन गेला . त्यानंतर पोलीस पथकाने नमुद पिकअपचा पाठलाग चालु केला . नमुद पिकअप माजलगाव येथील समता कॉलनी येथे आला असता पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील पिकअप तेथेच सोडुन तो अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला . त्यानंतर पोलीस पथकाने पंचांसमक्ष नमुद पिकअपची पहाणी केली असता त्यामध्ये किंमत रुपये 6,58,944 / – चा राजनिवास सुगंधीत पान मसाला , किंमत रुपये 1,64,736 / – रुपयांचा जाफराणी जर्दा व किंमत रुपये 6,00,000 / – चा महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पो असा एकुण 14,23,680 / – रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद सर्व मुद्देमाल जप्त करुन पोलीस स्टेशन माजलगाव येथे पुढील कारवाईसाठी जमा करण्यात आला आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक , बीड , श्री . हर्ष ए . पोद्दार , मा . अपर पोलीस अधीक्षक , आंबाजोगाई , श्रीमती स्वाती भोर , मा . उप विभागीय पोलीस अधिकारी , माजलगाव , श्री श्रीकांत डिसले , पो.नि.श्री . भारत राऊत स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी सपोनि आनंद कांगुणे , पोना झुंबर गर्जे , पोना पोना संतोष हांगे , पोकों गोविंद काळे , पोकों अन्वर शेख व चालक पोना गहिनीनाथ गर्जे यांनी केलेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *