अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; सिरसाळा येथील घटना
सिरसाळा /अतुल बडे : अल्पवयीन असणाऱ्या एका मुकबधीर मुलीस घरी बोलवून अत्याचार केल्याच्या प्रकार शनिवार दि 16 रोजी सात वाजेच्या सुमारास सिरसाळा येथे घडला. पिडीत मुलीची आई बाहेर गावाहून आल्यावर त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी संतोष भागवत तेलंग (वय34) याच्या विरुद्ध बलात्कार व पोस्को कलमा खाली मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी व पीडिताच कुटुंब सिरसाळा येथील पोहणेर रस्त्यावर वास्तव्यास आहे.
शनिवारी दि 16 रोजी त्या मुलीची आई काही कामानिमित्त बाहेर गावी गेली होती तिच्या घरात मोठं माणूस कोणीच नाही याचा गैरफायदा घेत आरोपी संतोष याने अल्पवयीन तसेच मुकबधीर असणाऱ्या त्या मुलीस स्वतः च्या घरी नेऊन बळजबरीने अत्याचार केला. हा सारा प्रकार तिच्या लहान बहिनेने पाहिल्याने आई गावाहून घेरी येताच मोठ्या बहिणी सोबत घडलेला प्रसंग सांगितला आई ने याची खात्री करून घेण्यासाठी हातवारे करून पीडितेस विचारले तिने मान हलवून होकार दिला. केलेल्या कृत्याचा जाब विचारण्यास तिची आई संतोष च्या घरी गेली असता तू जर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी ही त्याने दिली. भितीपोटी आईने ही कोणास काही सांगितले नाही पुढे दोन दिवसांनी तिची भावजय घरी येताच या दोघींनी ही येथील ठाणे गाठत तक्रार केली.दरम्यान पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संतोष तेलंग याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376 बलात्कार, 506, तसेच बाललैंगिक संरक्षण 3,4,7,8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनक पुरी हे करत आहेत.
आरोपीस अटक केली असल्याचे ठाणे अंमलदार आर टी नागरगोजे यांनी सांगितले.