अर्जापूर पानसरे महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – बिलोली तालूक्यातील अर्जापूर पानसरे महाविद्यालय येथील फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या बारावी परिक्षेतील विद्यालयातील (कला) शाखेचा निकाल 74.32% टक्के लागला असून कला शाखेतून घाटे स्वपनील गौतम रा.गंजगाव 81.38% गुण घेवून विद्यालयातून कला शाखेतून सर्व प्रथम येण्याचा बहूमान मिळवीला,बोईनवाड आकाश बालाजी रा.बिलोली 79.23% गुण घेवून सर्व द्वितीय येण्याचा तर रेत्तेवाड सुरज दत्तात्रय  रा.बेळकोणी 76.46% गुण घेवून  महाविद्यालयातून सर्व तृतीय येण्याचा बहूमान मिळवीले.कला शाखेतून विद्यालयातून बारावी परिक्षेस एकूण 148 विद्यार्थी बसले होते.त्यातून 110 विद्यार्थी पास तर 38 विद्यार्थी नापास झाले.तर विद्यालयातील (वाणिज्य) शाखेचा निकाल 88.70 टक्के लागला असून वाणिज्य शाखेतून मचंलवाड प्रतिक्षा मारोती रा.सावळी 89.07% गुण घेवून सर्व प्रथम येण्याचा बहूमान मिळवीली,पवार अजय कुशल रा.डोणगाव 83.53% गुण घेवून सर्व द्वितीय येण्याचा तर कंडमवार सवीता विठ्ठल रा.सावळी 83.38% गुण घेवून महाविद्यालयातून सर्व तृतीय येण्याचा बहूमान मिळवीली.वाणिज्य शाखेतून विद्यालयातून बारावी परिक्षेस एकूण 62 विद्यार्थी बसले होते.त्यातून 55 विद्यार्थी पास तर 07 विद्यार्थी  नापास झाले.तसेच (विज्ञान) शाखेचा निकाल 92.23 टक्के लागला असून विज्ञान शाखेतून शेख समीर दस्तीगीर रा.बिलोली 87.53% गुण घेवून महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून सर्व प्रथम येण्याचा बहूमान मिळवीला.शेख मो.सिजरहयात मो.अकबर रा.बिलोली,86.61% गुण घेवून सर्व द्वितीय येण्याचा तर काझी सदमानी मुजीबोदीन रा.बिलोली 84.46% गुण घेवून सर्व तृतीय येण्याचा बहूमान मिळवीला.विज्ञान शाखेतून विद्यालयातून बारावी परिक्षेस एकूण 103 विद्यार्थी बसले होते.त्यातून 95 विद्यार्थी पास तर 08 विद्यार्थी नापास झाल्यांची माहीती महाविद्यालयचे सचिव सुनील रामाकांत बेजगमवार यांच्यातर्फे प्राप्त झाली.तर महाविद्यालयातील बारावी परिक्षेत उत्तिर्ण झालेल्या यशवंत गुणवंत विध्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे अध्यक्ष मनोहरराव देशपांड,सचिव सुनील रामाकांत बेजगमवार,उपाध्यक्ष राजेश्वर गोविंदू उत्तरवार,नागनाथ पाटील सावळीकर,कोषाध्यक्ष गंगाधर सब्बनवार,प्रिन्सिपल डाॅ.श्रीरामे ए.एच,प्रा.नाईक व्ही.एच आणि सर्वसन्मानीय संचालक,प्राध्यापक,कर्मचारी वर्ग अभिनंदन करीत आहे.तसेच विद्यालयातील गुणवंता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असून तसेच ऑनलाइन अडमिशन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.याकामी महाविद्यालयाचे दोन्ही विभागाचे प्रिन्सिपल,प्राध्यापक,कर्मचारी परिक्षम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *