अरे देवा,शिक्षकांवर आली आता किराणा वाटण्याची वेळ…!
बीड : जिल्ह्यातील शिक्षकांना कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर त्यांच्या योग्येतेनुसारच कामे द्यावीत. जीवनावश्यक वस्तू व किराणा सामान घरपोच वाटपासारखी कामे देऊ नयेत. पाटोदा तहसीलदार यांनी तसे काढलेले आदेश त्यांना तात्काळ रद्द करण्यात सांगावेत.अशा मागणीचे लेखी निवेदन मराठवाडा शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष डि.जी.तांदळे व सचिव राजकुमार कदम यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दिले आसल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे परळी तालुका सचिव बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या बाबत अधिक माहिती अशी की,२१ मे रोजी पाटोदा तहसीलदार यांनी नगर पंचायत हद्दीत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार जीवनावश्यक वस्तू व किराणा सामान याद्या प्रमाणे घरपोच वाटप करण्यात यावे असे आदेश निर्गमित केले आहेत. शिक्षकांना दिलेले हे काम त्यांच्या योग्यते नुसार नसून त्यांची अवेहलना करणारे आहे. कोरोना माहामारित चेकपोस्टवर,दवाखान्यात, पोलीस स्टेशन, राशन दुकान, तहसील कार्यालय आदी ठिकाणी शिक्षक कार्यरत आहेत. या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली कामे त्यांच्या योग्यतेनुसार आहेत. व ते करण्यासाठी ते तयार आहेत. मात्र पाटोदा तहसीलदार यांनी कसलाही विचार न करता शिक्षकांची विद्यार्थी व समाजाप्रती अवेहलना करणारा आदेश काढला आहे. जिल्हाधिकारी यांनी
हा आदेश त्यांना तात्काळ परत घेण्याचे सुचित करावे.व शिक्षकांना योग्यतेनुसार कामे द्यावेत.अशी मागणीचे निवेदन मरावाडा शिक्षक संघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डि.जी.तांदळे व सचिव राजकुमार कदम यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दिल्याचे बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.