अफवांवर विश्वास ठेवू नका – तहसीलदार राजपूत

कुंडलवाडी (प्रतिनिधी) – एका टिव्ही चँनेलवर कुंडलवाडीत कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण सापडला अशी बातमी आल्यांचे शोशल माध्यमातून वायरल झाले होते. त्यामुळे कुंडलवाडी येथील नागरिक संभ्रमावस्थेत पडले होते.याबाबत बिलोली तहसीलदार विक्रम राजपूत यांना संपर्क साधला असता त्यांनी नागरीकांनी कोणत्याच व कसल्याच प्रकारचा अफवांवर विश्वास ठेवू नये तालूक्यात आद्यप पर्यंत एक पण कोरोना पाॅझिटीव्ह  रूग्ण सापडाला नाही.तसा काही प्रकार घडला असता तालूका प्रशासन पत्रकारांचा माध्यमातून जनतेपर्यंत माहिती पोहचवीते तरी नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवूनये.असे आवाहन बिलोली तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केले.तरी याबाबत शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते कोरोना रूग्ण सापडलेले कुंडलवाडी गाव हे सांगली जिल्ह्यातील आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी हे गाव नसल्याचे स्पष्ट केले.नागरीकांना सांगीतले.एकंदरीत बिलोली तालूक्यातील महसूल प्रशासन आरोग्य प्रशासन,पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी दक्ष असल्यांचे चित्र दिसायला मिळत आहे.तसेच पालिका पदाधिकारी,प्रशासकीय अधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपापल्या परीने जनजागृती,दक्षता बाळगत असल्याचे चित्र दिसायला मिळत आहे.तरी नागरीकांनी घरात राहा सुरक्षित राहा.लाॅकडाऊन,संचारबंदी,शोशल डिस्टन्स नियमाचे पालनकरा,मास्कचा वापर करा आवश्यकता असेल तरच घरा बाहेर निघा.

178 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *