…अन् मुख्यमंत्री म्हणाले हा संयमाचा खेळ आहे !
मुंबई : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात कोरोनाग्रस्त आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवून राज्यभरातील कोरानाग्रस्त रूग्णांची संख्या सविस्तर माहिती सांगीतली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, २० टक्के लोकांमध्ये गंभीर आणि अती गंभीर लक्षणे दिसून येत आहेत. पण ते देखील दिसता कामा नयेत. येत्या ३ मे रोजी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पुर्ण होत असून, या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरातील आकडेवारी सह माहिती देवून हा संयमाचा खेळ आहे. गाफिल राहून चालणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.