..अन् त्या माय माऊली ने दिले ना.धनंजय मुंडेना आर्शीवाद…!

परळी : लाॅकडाऊन घोषित होण्याचा आधी आपल्या मुलगा आणि सुनेचे भांडण मिटवण्यासाठी नेरुळला आलेल्या सासू तुळसाबाई व्हावळे यांना सुनेने घरातून हाकलून दिल्याने उपाशी व बेघर होण्याची वेळ आली आहे. मुंबईतील एका दैनिकाने हे वृतप्रकाशीत केले होते राज्याचे सामाजिक न्यायमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या ते वृत निदर्शनास आले आणी तेथील समाजकल्याण विभागाच्या बलभीम शिंदे या अधिका-यांशी संपर्क करुन त्वरित त्या महिलेची भेट घेऊन तात्काळ मदत करा अश्या सुचना देऊन नेरुळमध्ये वाशीच्या शेल्टर हाउसमध्ये त्यांच्या निवासाची सोयीची मदत केली असुन
तुळसाबाईंनी डोळे पाणावत ना.धनंजय मुंडेंचे आभार आणी आशीर्वाद दिला.
दरम्यान संकटात असताना गेल्या दीड महिन्यापासून ज्यांनी आसरा दिला त्यांच्या सोबतच पुढील काही दिवस काढण्याची इच्छा तुळसाबाईंनी त्यांनी व्यक्त केली.
परळी येथील त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन तुळसाबाई ह्या सुखरूप असल्याचे ना.धनंजय मुंडे यांच्यामार्फत कळविले जाणार आहे.
आपण अडचणीत असल्याचे समजताच मदतीसाठी पुढे येऊ लागलेल्यांना पाहून तुळसाबाई यांचे डोळे पाणावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *