अनावश्यक फिरणे,गर्दी करणे टाळा घरातच सुरक्षित रहा-न.प.गटनेते चंद्रकांत राठोड

सोनपेठ /मंजूर मूल्ला : शहरात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शहरातील नागरिकांच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी सोनपेठ नगरपरिषदेकडून काळजी घेतली जात आहे.यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता घरातच सुरक्षित रहावे असे अवाहन सोनपेठ नगरपरिषदे गटनेते चंद्रकांत राठोड यांनी केले आहे.

केंद्र व राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदारपणे सर्वच स्थरातून प्रयत्न सुरू केले आहेत.संपूर्ण देशाला हतबल करणाऱ्या कोरोना रोगापासुन दुर रहाण्यासाठी सोनपेठच्या नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच थांबावे विणाकारन घराबाहेर पडल्यास आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येऊ शकतो यामुळे केंद्र व महाराष्ट्र राज्य प्रशासन वारंवार जनतेला विनंती आवाहन करत असुन आपल्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करीत आहे.
कोरोना रोगाला हरवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन जोरदार तयारी करत असुन यात शहरात दररोज दोन वेळी रस्त्यावर झाडू मारने,अग्निशमन गाडीच्या साह्याने सँनेटाईझर आणी जंतुनाशक औषध फवारणी करणे,नाली सफाई करून ताबडतोब कच-याचे ढिगारे उचलने,नळाद्वारे भरपूर पाणी सोडणे,कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे असे अनेक प्रकारचे काम नगरपरिषदे कडून करण्यात येत आहे.आपला शहर कोरोना विषाणू पासुन अलिप्त रहाण्यासाठी पोलिस प्रशान,तहसिल प्रशासन,आरोग्य विभाग,आपापली जबाबदारी योग्यरितीने पार पाडीत आहे यामुळे शहरातील नागरिकांनी सुधा प्रशासनाला सहकार्य करून जिवनावश्यक वस्तू खरेदी करताना गर्दी न करणे विनाकारण रस्त्यावर फिरणे टाळावे हि वेळ गंभीर आहे काहिदीवस आपल्याला त्रास होईल शहराला या रोगापासुन रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनेचा पालन करावे केंद्र व राज्य सरकार आपल्या परीने आपली काळजी घेत असुन सोनपेठ नगरपरिषद हि आपल्या आरोग्य बाबतची पुर्ण काळजी घेत आहे तरी शहरवासियांनी अनावश्यक आपल्या घराबाहेर न निघता घरातच सुरक्षित राहावे जिवनावश्यक वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्सींगचा कायादा पाडावे.बाहेर पडताना माक्सचा वापर करावे.वारंवार सँनेटायझर किंवा साबनाने हात धुवावेत घरात स्वच्छता ठेवावी व तसेच वृध्द व्यक्तीनां व लहान मुलांना घरा बाहेर न जाऊ देणे.आपल्या शहराच्या स्वच्छतेची व आपल्या आरोग्याची काळजी सोनपेठ नगरपरिषदेकडून घेतली जात आहे.कृपा करून बिना कामाचे कोणीही घराबाहेर पडू नये.असे आवाहन सोनपेठ नगरपरिषदेचे गटनेते चंद्रकांत राठोड यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *