अट्टल दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या
बीड : येथील स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून दोन बुलेट गाड्या हस्तगत केल्या आहेत. एक गाडी शिरुर कासार पोलीस ठाणे तर दुसरी शिक्रापूर ता.जि.पुणे ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या होत्या या गाड्यांचा शोध लावण्यात बीड पोलिसांना यश आले आहे.
श्रावण गणपत पवार रा. नवगन राजुरी ता.जि.बीड असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो चोरुन आणलेल्या बुलेट गाडीवरुन फिरत असल्याची खबर पोलिसांना दि.27 रोजी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले असता त्याने दोन बुलेट गाड्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यापैकी एक दुचाकी शिरुर कासार येथून चोरी केली होती. चौकशी केली असता ती बुलेट गाडी.एच.23 बी.ए.4788 शिरुर पोलिसात ठाण्यात दाखल गुन्ह्यानूसार मारोती कोंडिबा खरमाटे.खोकरमोह ता. शिरूर जि.बीड याची असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने शिक्रापूर.जि.पुणे येथून आणखी एक बुलेट चोरून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही गाड्या जप्त करुन स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, कर्मचारी भास्कर केंद्रे, तुळशीराम जगताप, शेख नसीर, मुंजाबा कव्हारे, बालाजी दराडे, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे, नारायण कोरडे, शेख अन्वर, वाहनचालक संजय जायभाये, संतोष जायभाये यांनी केली आहे.