औरंगाबाद

अजिंठा-वेरूळची लेणी उद्यापासून उघडणार

शिवना प्रतिनिधि

औरंगाबाद जगप्रसिद्ध वेरुळ आणि अजिंठ्याची लेणी उद्यापासून ( दि.१०) रोजी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन व्यवसायिकांनी औरंगाबाद शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळे खुली करावी ,अशी मागणी केली होती. त्या मागणीला शासनाने पर्यटनस्थळ खोली करण्याला परवानगी दिली आहे.पण कोरोना मुळे काही अटी आणि शर्ती लावल्या आहेत पर्यटन स्थळे बंद असल्याने या व्यवसायातील व्यक्तींच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे राज्य सरकारने परवानगी दिली. या व्यवसायावर ११ वेगवेगळ्या प्रकाराचे व्यवसाय अवलंबून आहेत. त्यामुळे काही पर्यटन स्थळे खुली करावी अशी मागणी करता या व्यवसायिकांनी औरंगाबादला आंदोलन केले होते . त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या मागण्याचे निवेदन ही राज्याच्या पर्यटन पर्यटनमंत्री कडे सादर केले होते त्याप्रमाणे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्य सरकार यांचा आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *