अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा …..!

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना संसर्गाचे संकट असतांना राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती होती. मात्र, याचदरम्यान निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा देत विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विनंतीवरून निवडणूक आयोगाची शुक्रवारी बैठक पार पडली. यानंतर निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी विधानपरिषदेच्या निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

129 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *