अखेर बीडला कोरोनाने घेरलेच ; दोघे पाँझिटिव्ह

बीड : बीड जिल्ह्याने इतके दिवस कोरोना विरोधात लढविलेली खिंड अखेर पडली. मुंबई आणि पुण्याहून विना परवाना बीड जिल्ह्यात आलेल्या गेवराई आणि माजलगाव मधील प्रत्येकी एका व्यक्तीचे अहवाल आले आहेत. यामुळे आता बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे.
बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मागील महिन्यात सापडलेला रुग्ण नगर जिल्ह्याच्या जवळ होता. तसेच त्याच्यावर नगरमध्येच उपचार सुरु होते आता मात्र गेवराई आणि माजलगाव या ठिकाणी कोरोनाचा प्रत्येकी एक रुग्ण आढळूनआला आहे. गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईहून विना परवानगी बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे. या दोन रुग्णांचे कोरोना नमुने पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केली आहे. आता या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरु झाली आहे. यामुळे आता बीड जिल्ह्याला अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

349 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *