अखेर फडणवीसांचेच वर्चस्व ; पंकजा मुंडे व खडसे यांना धक्का…!

मुंबई: विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. जाहीर केलेली यादी खालीलप्रमाणे पाहता आज तागायत तरी देवेंद्र फडणवीस यांचेच वचर्व दिसून येत आहे.भाजपने चर्चेत असलेल्या उत्सुक नेत्यांनाधक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, माजी महापौर प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांना पक्षप्रमुखा कडून मोठा धक्काच दिल्याचे बोलले जात आहे.

390 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *