अखेर तीन कृषी सेंवा केंद्राचे परवाने निंलबीत
आमठाणा (प्रतिनिधी) – विभागीय सहसंचालक डी एल जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक टी एस मोटे, जिल्हा विकास अधिकारी आनंद गंनजेवर यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड तालुक्यातील मौजे घाटनंदरा येथे प्रशांत पवार तंत्रधिकारी विभागीय गुणनियंत्रण निरीक्षक औरंगाबादधम्मशीला भडिकर जिल्हा कृषी अधिकारी ( सामान्य )जि प औरंगाबाद दीपक गवळी तालुका कृषी अधिकारी सिल्ल्लोड यांच्या संयुक्त पथकाने गोपनीय माहिती व जादा दराने खत विक्री होत असल्याच तक्रारी पथकाला मिळाल्या होत्या, संयुक्तपथकाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला असत जादा दराने खत विक्री होत असल्याचे निःपण झाले. अरिहंत कृषी सेवा केंद्र आदिनाथ कृषि सेवा केंद्र, यश कृषि सेवा केंद्र खतजादादराने विक्री करत असल्याचेदिसूनआले यांचेवर पुढील कार्यवाही होणेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रस्ताव पाठविनायत आला आहे, चिंतामणी कृषि सेवा केंद्र यांना खत विक्री बंद आदेश देण्यात आला.दर्शना कृषि सेवा केंद्र , श्रीनाथ ऍग्रो एजन्सी यांनी पथकाला पाहून पोबारा केला, गुळवे ऍग्रो एजन्सी यांनी दुकान बंद न करता काढता पाय घेतला या मुळे त्यांचे परवाने निलंबित का करण्यात येऊ नये अशी नोटिस देण्यात आली आहे जर विहित कालावधीत समाधान कारक उत्तरे प्राप्त झाली नाही तर 3 कृसेवा चालकांचे परवाने निलंबित केले जातील .याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक मनाजी बाळा पवार, कृषि सहायक योगेश हराळ उपस्थित होते.