जालना

अखेर आष्टी बसस्थानकाची निकृष्ट पिओपि लंपास; दै. जगमिञच्या पाठपुराव्याची दखल

आष्टी (प्रतिनिधी ) – नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आष्टी बसस्थानक इमारत सेडला रविवारी पडलेल्या पावसामुळे अखेर मुहूर्त सापडला व सतत कोसळणारी जीवघेणी पीओपी कंत्राटदार यांच्या कडून सकाळीच लंपास करण्यात आली.निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या सई कन्ट्रक्शन या एजन्सी कडून आर्थिक दंड वसुल करण्यात येणार असून. दैनिक जगमिञच्या  सततच्या पाठपुराव्यामुळे धोका टळल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.     याविषयी सविस्तर माहिती आशी की,परतूर तालुक्यातील आष्टी येथे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन योजनेतून नवीन बसस्थानक बांधकाम हाती घेण्यात आले होते या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचेकडे करण्यात आली होती, अशातच या बसस्थानक बांधकामाला घरघर लागली व बसस्थानक निवारा सेड मोडकळीस येऊन त्यास केलेली पीओपी अचानकपणे कोसळून कोसळू लागली त्यामुळे सदर बसस्थानक इमारत सेड हे प्रवाशांसाठी जिवघेणे ठरले होते,म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते उद्धव डोळस यांनी तहसीलदार परतूर यांना याबाबत लेखी निवेदन देऊन बसस्थानक वापरा योग्य नसून यामुळे प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला त्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली होती पण संबंधित विभागाला तहसीलदार यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देऊन सुद्धा दुर्लक्षित केले होते परंतु रविवारी झालेल्या पावसामुळे लोबकळत असलेली पीओपी भल्या पहाटे काढून लंपास केली आहे,       दैनिक जगमिञने  केलेल्या पाठपुरावव्या मुळे आष्टी बसस्थानकावर निर्माण झालेल्या चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला असून यापुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सई कन्ट्रक्शन ची रिकव्हरी काढणार – अभियंता प्रदीप जोशी
 याविषयी संबंधित विभागाचे बांधकाम अभियंता प्रदीप जोशी यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता असे सांगितले की, मोडकळीस आलेली पीओपी सई कन्ट्रक्शन जालना या एजन्सी मार्फत काढण्यात आली असून सदर कामाचे देयके पूर्णपणे एजन्सीला दिले नसून केवळ 10 लक्ष रुपये अदा करण्यात आले आहेत उर्वरित निधी अजून उपलब्द नसल्याचे श्री जोशी यांनी सांगितले आहे,बसस्थानक काम केलेल्या सई कन्ट्रक्शन जालना यांची रिकव्हरी काढण्यात येणार असून त्यांना तो भुर्दंडाचा भार सहन करावा लागेल असेही अभियंता प्रदीप जोशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *