अंबुलन्सची वाट बघून कोरोना पेशंटनी पायीच गाठला दवाखाना- विनायक शंकुरवार
परळी (प्रतिनिधी)- शहरातील कोरोना संसर्गाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे … रुग्णांची वाढत जाणारी संख्या परळीकरांच्या चिंतेत भर टाकत आहे. प्रशासना कडून सर्व अलबेल असताना रुग्ण संख्या वाढीप्रमाणे नियोजनाचा ढिसाळपणा सुध्दा वाढताना दिसत आहे. दिनांक 7 ऑगस्ट रोजी इंडस्ट्रियल एरिया मधील रुग्णास आपण पॉझिटिव्ह आहात, दवाखान्यात जाण्यास तयार राहा, अम्ब्युलन्स येत आहे, असा कॉल आला. त्या प्रमाणे हा रुग्ण तयार होऊन अम्ब्युलन्स ची वाट पाहत बसला, तब्बल 4-5 तास वाट बघून ही अम्ब्युलन्स आलीच नाही. शेवटी या रुग्णाने पायी चालत चालत कोविड केअर सेंटर गाठले.. या प्रकारास काय म्हणावे ? प्रशासनाची तत्परता की प्रशासनाचा ढसाळपणा ? तरी प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक शंकूरवार यांनी केली आहे …