अंबाजोगाई येथे मौतीसाठी जाणाऱ्या चौघांवर होळ ता,केज येथे प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी!
केज : धारूर येथील मुस्लिम धार्मिक कार्य करणाऱ्या व अंबाजोगाई येथे मौतीसाठी जाणाऱ्या चौघावर दि,१६ बुधवार रोजी रात्री दहाच्या सुमारास होळ तालुका केज येथे सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केला यात दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, यावेळी संबंधित लोकांनी जातिवाचक शिवीगाळ करत जखमी जवळील रोख रक्कम सुद्धा पळवली, अशा या प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी केज येथील मुस्लीम समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे आरोपींना लवकरात लवकर अटक न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून संबंधित आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील मुस्लिम समाजाकडून होत आहे