अंबड येथे कत्तल खाण्यावर पोलिसांची धाड दोन खाटकांना अटक
“सिंघम” चाटे यांच्या कारवाईने गोवंश हत्त्या उघडकीस
अंबड/जहीर शेख – शहरात गेल्या अनेक दिवसापासून छुप्या पध्दतीने गुटखा, दारु,सुंगधी तंबाखू बरोबर जनावरांच्या कत्तल करण्याचे व्यवसाय सुरू असल्याचे पोलीस कारवाईतुन उघड झाले आहे या अवैध धंद्याविरोधातगेल्या पंधरा दिवसापासुन स्थानिक गुन्हे शाखा जालना व स्थानिक पोलीसांनी केलेल्या कारवाईत अवैधरित्या गुटखा, तंबाखू, जुगार, दारु,हातभट्टी तसेच जनावरे कापणा-यावर छापे टाकण्यात येवून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेतअंबड पोलीस ठाण्याचे “सिंघम”सुग्रीव चाटे पोलीस उप-निरीक्षक यांनी कत्तलकरणा-या खाटका विरोधात अंबड पो.स्टे ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि .१६ मे रोजीचे मध्यरात्रीच्या सुमारास वाजता होमगार्ड खरात,चालक पोकॉ डेगळ असे सरकारी जीप ने रात्रगस्तीची पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , इमरान कादर कुरेशी याच्या राहत्या घरी गोवंशीय जणांवराची कत्तल केली जात आहे.अशी माहिती मिळाल्यावरुन रात्रगस्तीचे कर्मचारी पो.ना राठोड,पोकॉ तळेकर , होमगार्ड खालेद शेख ,शेळके व दोन पंच यांना आंबेडकर नगर येथे बोलावून सदरची माहिती सांगुन माहिती मिळालेल्या ठिकाणी जाऊन छापा मारणे आहे असे सांगितले. त्यानंतर आम्ही सदरची माहिती मा.पोलीस निरीक्षक अंबड यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली वरील स्टाफ व दोन पंचासह माहिती मिळालेल्या ठिकाणी कुरेशी मोहल्ला येथे इमरान कादर कुरेशी याच्या घराच्या समोर पहाटे ४:२१ वा . जाऊन त्याच्या घराचा दरवाजा वाजवला असता दरवाजा उघडुन एक इसम बाहेर आला.तो घाबरलेल्या अवस्थेत दिसुन आला. त्याला आमचा ,स्टाफ व पंचाचा परिचय देवुन छापा टाकण्याचा उद्देश कळवुन त्याचे नाव , गाव विचारले असता त्यांनी त्याचे इमरान कादर कुरेशी वय ३२ वर्ष रा.कुरेशी मोहल्ला , अंबड असे सांगितले . त्याचे घराचे आतमध्ये पंचासह जाऊन पाहणी करता त्या ठिकाणी दुसरा एक इसम व एका कापलेल्या ड्रममध्ये , दोन कॅरेटमध्ये व पांढऱ्या बकेटमध्ये जनावरांचे मांसाचे मोठे मोठे तुकडे दिसुन आले. तेथे हजर असलेलया दुसऱ्या इसमास त्याचे नाव , गाव विचारता त्यांने त्याचे नाव शारूख चाँद कुरेशी वय २३ वर्ष रा.कुरेशी मोहल्ला , अंबड असे सांगितले . त्यांना जनावरे कापण्याचा परवाना आहे का असे विचारले असता त्यांनी नसल्याचे सांगितले . सदर ठिकाणचा पंचासमक्ष जप्ती पंचनामा केला जनावरांच्या मांसाचे मोठ मोठे तुकडे , वरील ठिकाणी मिळून आलेले साहित्य व मांसाचा दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून ते ताब्यात घेतले . त्यानंतर फयुम इसाब खाटीक यास त्याचा लोडींग अँपे सदर ठिकाणी बोलावुन जप्त केलेले मांस ॲपे रिक्षा मध्ये टाकुन त्या ठिकाणी मिळून आलेल्या नमुद दोन इसमास ताब्यात घेतले पोलीस . इमरान कादर कुरेशी वय ३२ वर्ष व, शाहरूख चाँद कुरेशी वय २३ वर्ष रा.कुरेशी मोहल्ला ,अंबड हे विनापरवाना त्यांच्या राहते घरी गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांच्या मांसाचे तुकडे करुन ते जवळ बाळगतांना मिळुन आल्याने त्यांच्या विरूध्द कलम ४२ ९ , ३४ भादंवी , सहकलम ५,५ ( क ) , ९ ,९ ( अ ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण ( सुधरणा ) अधिनियम १ ९९ ५ प्रमाणे कायदेशीर फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी दिली आहे.