Uncategorizedजालना

अंबडमध्ये तीन महिन्याच्या चिमुकल्याची पाण्याच्या टाकीत टाकून हत्या

अंबड (प्रतिनिधी) ः अंबड शहरामधील बाबासाहेब आंबेडकर शाळा जवळी रहिवासी असलेल्या पायल विजय जाधव यांच्या मुलाची पाण्याच्या टाकीत टाकून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबड शहरातील आंबेडकर नगर येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा जवळ राहणार्‍या पायल विजय जाधव यांच्या तीन महिन्याच्या चिमुकल्यास घराच्या बाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकून हत्या करण्यात आली. पायल विजय जाधव यांनी रात्री उशीराने झोपावेळीस आपल्या बाळाला पलंगाला बांधलेल्या झोळणीत दुध पाजून झोपी घातले होते. परंतू रात्री अचानक पायल जाधव यांना जाग आली आणि त्यांनी त्या झोळनीमध्ये बाळाला बघीतले असता त्या झोळनीतील बाळ गायब झाल्याचे त्यांना दिसून आल्याने त्यांनी अंबड पोलीस ठाणे येथे धाव घेतली. त्यानंतर घटनेची पडताळणी करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले असता त्या बाळाचा मृत्तदेह घरासमोरील पाण्याच्या टाकीमध्ये आढळून आल्याने शहरामध्ये मोठी खळबळ उडाली.
सदरील घटनेबाबत अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्या  केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *