अंबडच्या कोरोना बाधित तरुणाच्या संपर्कात आलेला कुटुंब स्वघरी परतला

अंबड (प्रतिनिधी) -:अंबड शहरातील नाइकवाडी मोहल्ला वंजार गल्लीतील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरणाला काही दिवसा पूर्वी डिसचार्ज मिळाला होता आणि आज गुरूवारी रोजी त्याच्या पूर्ण कुटुंबाला आरोग्य विभागा कडून चौदा दिवसा नंतर डिसचार्ज देण्यात आला अंबड उप जिल्हा रुग्नालयाचे चिकित्सक डॉ श्री तलवाड़कर यानी त्या बाधित तरुणाच्या कुटुंबावर खुप मेहनत करुण त्यांच्या तब्बेतित लवकरात लवकर कशी सुधारना करता येईल याच्यावर भर दिला व  त्यांच्यावर अंबड येथेच उपचार करुण त्यांना आज डिसचार्ज दिले.डॉ तलवाड़कर हे अंब ड च्या कोरोनाचे खरे नायक ठरले आहे राज्याचे आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी श्री रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेत असलेल्या सरकारी यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या अखंड प्रयत्नाचे हे खऱ्या अर्थाने मोठे यश मानले जात आहे.अंबड येथील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांच्यावर जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र सतर्क राहून योग्य ते उपचार केले पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर देखील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आपला सकारात्मक लढा कायम ठेवला.परिणामी  काल गुरुवारी अंबड येथील वंजार गल्लीतील त्या तरुणाच्या सर्व कुटुंबाचे अहवाल निगेटिव आल्याने त्याना डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या वस्ती ग्रहातून सुट्टी देण्यात आली या वेळी उपविभागीय अधिकारी श्री शशिकांत हाथगल,तहसीलदार श्री राजीव शिंदे,मुख्याधिकारी श्री सागर घोलप,पोलीस निरीक्षक श्री अनिरुद्ध नांदेड़कर,डॉ श्री तलवाड़कर,तालुका वैद्यकीय अधिकारी श्री रोडे,श्रीमती डॉ घुगे,श्री डॉ पांढरे,फेरोज शेख,जाकेर डावरगावकर अरुनभाऊ उपाध्ये,नसीर बगवान यांची उपस्थिति होती डॉ तलवाड़कर यांनी डिसचार्ज मिळालेल्या चिमुकलीला नवीन फ्रॉक भेट म्हणून दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *