अँटिजेन टेस्ट : परळीत आज दिवसभरात २०३२ पैकी १०५ पाॕझिटिव्ह

परळी वैजनाथ /प्रतिनिधी परळी शहरात आरोग्य प्रशासनाच्या वतिने शहरातील नागरिकांच्या अॕन्टीजन टेस्ट तपासणी कार्यक्रम आज सकाळी ९ वाजल्या पासुन चार बुथवर सुरु करण्यात आला होता. सायंकाळी ६ वाजे पर्यत नागरिकांनी आपली अॕन्टीजन तपासणी करुन घेतली आहे. या २०३२ पैकी १९२९ व्यक्ती निगेटिव्ह आढळुन आले तर १०५ व्यक्ती कोरोना बाधीत आढळुन आले आहेत. काल आणी आज अशा दोन दिवसांत ३३५३ नागरिकांनी रॕपीड अॕन्टीजन टेस्ट करुन घेतली, या मध्ये ३१८१ निगेटिव्ह तर १७२ कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. आज बुधवारी बुथ क्रमाक १] लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर येथे ४६० नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये ४२९ निगेटिव्ह तर ३१ पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत. बुथ क्रमांक २] सरस्वती विद्यालय येथे ५०४ नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये ४८५ निगेटिव्ह तर १९ पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत बुथ क्रमांक ३] बस स्थानक येथे ५२६ नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये ४८१निगेटिव्ह तर ४५ पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत बुथ क्रमांक ४] पंचायत समिती येथे ५४२ नागरिकांची अॕन्टीजन तपासणी झाली यामध्ये ५३२ निगेटिव्ह तर १० पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *